मला शिवाजी व्हायचंय!

                      

    ‘मला शिवाजी व्हायचंय!’                                        

‘मला शिवाजी व्हायचंय!’ हे श्री विनोद अनंत मेस्त्री यांनी लिहिलेलं अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील महान राजांपैकी एक आहेत.  त्यांनी एकाच वेळी सहा आघाड्यांवर सहा अतिशय शक्तिशाली शत्रूंना तोंड देत शून्यातून स्वतःचं राज्य निर्माण केलं. एक असं राज्य ज्याचं वार्षिक उत्पन्न सुमारे २ लाख करोड होतं.  सैन्यबळ २.६०,००० होतं. स्वतःचं आरमार उभं करून त्यात ६५० लढवू नौका व जहाजं होती.  ३६० किल्ले होते. १२ हून अधिक देशांशी अंतर राष्ट्रीय व्यापार होता. एक असं राज्य ज्यात न्याय, समानता, लोककल्याण होतं.  त्यांनी आपल्या स्वप्नाचं स्वराज्य उभं केलं आणि लोकांच्या विचारांमध्ये अजरामर झाले.

महाराष्ट्रातले लोक त्यांची देवासारखी पूजा करतात. कित्येक लोक त्यांचा इतिहास वाचतात आणि प्रेरित होतात.  परंतू नक्की महाराजांच्या इतिहासातून काय  शिकायचं आणि त्याचा वापर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कसा करायचा, हे समजण्यात मात्र त्यांना अपयश येतं. ‘मला शिवाजी व्हायचंय!’ हे पुस्तक लोकांना महाराजांचा इतिहास जाणून घ्यायला तर मदत करतंच परंतु त्याच बरोबर महाराजांचे व्यक्तिमत्व विकास गुण कौशल्य काय होते, महाराजांनी त्यांचा वापर त्या काळात कसा केला आणि ते या काळात आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसं लागू करू शकतो हे शिकायला मदत करते.

या पुस्तकातील सगळीच शिकवण उल्लेखनीय आहे.  यातील प्रत्येक प्रकरण आपल्याला प्रेरित करतं आणि विविध व्यक्तिमत्व विकासाच्या गुणांचं आपल्या मध्ये बीजारोपण करतं. चार प्रकारच्या मानवी वागणुकी कोणत्या आणि त्यातील अत्यंत योग्य वागणूक कोणती? स्वप्नांचा नेमका अर्थ काय? मोठी स्वप्ने कशी पहावीत आणि ती आपल्या जीवनात काय चमत्कार घडवून अनु शकतात? (स्वप्नांविषयी या पेक्षा प्रभावी शिकवण तुम्हाला कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही) मानवी स्नेहसंबंध आणि व्यवस्थापनाचे रहस्य काय? दीर्घकाळ टिकणारे स्नेहसंबंध तुम्ही कसे निर्माण करू शकता? लोकांचा पाठींबा कसा मिळवू शकता? संकटाचं रुपांतर संधीमध्ये कसं करावं? योजना कशा आखाव्यात आणि पार पाडाव्यात? बदल महत्वाचा का? तुम्ही बदलांशी स्वतःला सामावून प्रगती कशी साधू शकता? उच्च कार्यक्षमता म्हणजे काय? संयम, चिकाटी, विचारपूर्वक पत्करलेला धोका अशा एक न अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात सापडतील.

एकदा आपण हे पुस्तक वाचायला सुरुवात केली की महाराज आपल्याला आपले गुरु, आपले मार्गदर्शक वाटू लागतात. एक असा गुरु जो स्व अनुभवातून आपल्याला यशाचा मार्ग दाखवतो.

आपल्या प्रत्येकामध्ये एक ‘शिवाजी’ दडलेला आहे. हे ‘शिवाजी’ म्हणजे आपल्यातील ‘सुप्त शक्ती’. हे पुस्तक तुम्हाला तुमच्यातील ‘शिवाजी’ बाहेर काढण्यासाठी मदत करेल. तुम्हाला तुमच्या स्वप्नाचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी मदत करेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील ‘शिवाजी’ होण्यासाठी मार्गदर्शन करेल.

हे पुस्तक कॉलेजला जाणाऱ्या मुलापासून ते उद्योजका पर्यंत तरुणांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांना लागू होतं. तो प्रत्येक जण ज्याला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं आहे त्याने या पुस्तकातल्या थराराचा अनुभव जरूर घ्यावा.

विनोद मेस्त्री यांचा हा प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय आहे. हे अद्वितीय पुस्तक तरुण पिढीमध्ये अतिशय लोकप्रिय होत चाललं आहे आणि समीक्षकांकडून देखील याला उत्कृष्ट सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

याच्या पहिल्या आवृत्तीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि याची दुसरी आवृत्ती २९ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रकाशित होणार आहे.  मराठी सुपर स्टार स्वप्नील जोशी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून जीवनरंग प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे.

———————————————————————————————————————————

मला शिवाजी व्हायचंय! निवडक प्रतिक्रिया 

“It’s not only informative, but truly inspiring and reaches to the very subconscious level moulding the thought process. Such initiatives are value additions in the society. My compliments and best wishes.”                                                                                                             – श्री. आशुतोष राठोड,                                                                                                Officer on Special Duty, Ministry of Skill Development & Labour, Government of Maharashtra 

“I have read many books in past 31 years of life. I have never emailed any writer of those books.
Reading this book, I just couldnt stop myself from sending appreciation email to you.
This book is one of the best books I have read ever.
Although I am not a very frequent reader of many books but no other book had ever gave me goosbumps while reading it like this one did.
Fabulous work….tremendously impressed and I am sure this book will inspire and change lot of people’s lives in a positive way. Thanks for providing such a fabulous masterpiece. I have become fan of it and definitely will recommend it to all of the people I interact with.
Loads of best wishes to you for this book to be the best seller ever in the history.”
    – Mr. Sanket Naik, Software Consultant, Certified Nutritional Advisor (NHI California University)

“One of the best book I read! God bless you and may Mala Shivaji Vhayachay achieve the heights of success all over the world.”                               – सौ. मीना खळदकर-लामा, संचालिका कीर्तिदा प्रमोशन्स 

“मी आतापर्यंत वाचलेल्या मराठीतील व्यक्तीमत्व विकासाच्या पुस्तकांपैकी बहुदा हे सर्वोत्तम पुस्तकातील एक असावे. याचे एक कारण हे असेल कि ते महाराष्ट्रातील एका पितृतुल्य अशा महान व्यक्तिमत्वावर आधारित आहे. तैसी महाराजांवरील किंवा त्यांच्या गुणवैशिष्ट्याचे विश्लेषण करणारी पुस्तके आहेतच. मात्र, प्रत्येक प्रसंग आणि त्यातून झिरपणारे थोरल्यामहाराजांच्या चरित्राचे अमृत याचा व्यवस्थापन आणि मानवी व्यवस्थापनाच्या अंगातून विचार पुस्तक करते. इथेच हे पुस्तक थांबत नाही, तर त्यातून व्यक्तिमत्व विकासाचे काही पैलू बांधण्याचा, काही तत्व (प्रिन्सिपल्स) शोधण्याचा ते प्रयत्न करत. यासाठी जो प्रचंड अभ्यास आणि विश्लेषणात्मक मांडणीची लेखन शैली हवी ती श्री विनोद मेस्त्री यांच्याकडे आहे. त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय, अभ्यासनीय आणि अनुकरणीय झाले आहे.                                                               माझ्या आत्तापर्यंतच्या वाचनात घडलेल्या घटनांचे ऐतिहासिक आणि भौगोलिक वर्णन आले आहे. या पुस्तकात, त्या पलीकडे जाऊन मानसशास्त्रीय बाजू शोधण्याचा श्री मेस्त्री यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळे परिणामांची चतू:सृत्री, लोकांच्या मानसिकतेवर काम करण्याची महाराजांची पद्धती, आग्रा प्रसंगातील महाराजांची दिसलेली गुणप्रभा यांचे तुलनात्मक वर्णन आणि त्यातून काही ठोस ठोकताळे काढण्याचा प्रयत्न, व्यक्तिमत्व विकासाची विविध मुलतत्वे ठरवण्याचा प्रयत्न, यामुळे हे पुस्तक वेगळे होते.  हे पुस्तक महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाकडे पोहोचले पाहिजे. यासाठी फक्त प्रकाशकाने आणि लेखकाने नाही तर आपण सर्व सुज्ञ महाराष्ट्रधर्मियांनी प्रयत्न केला पाहिजे खास! श्री विनोद मेस्त्री यांचे वर तो आई जगदंबेचा हात आहे, तो सदैव राहावा हि प्रार्थना. राजते लेखानावधी।                                                                                                                                          – श्री. हर्षद माने, संस्थापक प्रबोधक 

“शिवरायांचा एखादा पोवाडा ऐकला किंवा भाषण ऐकलं कि एक जोश अंगात येतो परंतु तो त्या वातावरणात तेवढाच राहतो. ‘मला शिवाजी व्हायचंय!’ असा ‘क्षणिक’ जोश देत नाही… ते आतल्या आत भिनत जातं. शिवाजी महाराज आपले आदरस्थान आहेतच पण ‘ते’ आपले वाटू लागतात. आपले ‘गुरु’ वाटतात. ‘व्यक्तिमत्व विषयावर मराठीत फार कमी पुस्तके आहेत. जी आहेत ती इंग्रजी भाषांतरित किंवा इंग्रजी पुस्तकांचा प्रभाव असलेली आहेत. मला मी वाचलेलं , या विषयावरचं, आपल्या माणसाचं, आपल्या माणसाने लिहिलेलं हे एक ‘उत्तम’ पुस्तक वाटतं.”                                                                                – श्री. संदेश बालगुडे, लेखक 

“या पुस्तकात मांडलेले विचार प्रत्येक वाचकाच्या मनाला भिडणारे आहेत. महाराजांची या पद्धतीची ओळख एक नवी क्रांती आणि प्रेरणा आहे. हे पुस्तक वाचल्यापासून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे वेगळ्या दृष्टीकोनाने पाहू लागलोय. ‘मला शिवाजी व्हायचंय!’ हे शीर्षक किती समर्पक आहे ते पुस्तक वाचल्यावर कळले.”                             – श्री. विशाल महाडिक, उद्योजक 

“मी हे पुस्तक वाचले आणि निशब्द झालो……..फार फार फार अप्रतिम असे,प्रत्येक तरुणांनी वाचावे असे प्रेरनादाई पुस्तक आहे.हे पुस्तक वाचून माझ्या आयुष्यात मला नक्कीच फायदा होईल……धन्यवाद विनोद सर शिवरायांच चरित्र फार वेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत पोह्चोण्यासाठी.”                                                                    – श्री. आदित्य लोहे, वाचक नागपूर 

“मला शिवाजी व्हायचंय हे माझ्यासाठी केवळ पुस्तक नाही तर सतत प्रेरणा देणारी मार्गदर्शिका आहे.”                                                                                                                                    – श्री. सुमित कोंडविलकर

“महाराजांची नीती इतक्या सोप्या भाषेत मांडली आहे. खूप मोठं कार्य आहे तुमचं! मी हे पुस्तक एका दिवसात तीन वेळा वाचलं. स्वतःच्या लायब्ररीमध्ये जतन करून ठेवण्याजोगं पुस्तक आहे हे!”                                                                                                                                                                                                            – श्री. प्रीतम थवी 

“Mala Shivaji Vhaychay’ is Mind Blowing and from bottom of my heart…it will be world’s best seller book.”                                                                          – श्री. भास्कर पोखरकर, प्राध्यापक-उद्योजक  

“खुप छान….. शिवाजी महाराजांची तत्व, योजना ई. आजच्या काळात ही आपण वापरून कशी आपली प्रगती करू शकतो हयाची सहज व सोप्या भाषेत मांडणी केली आहे. उद्योग व व्यवसाय क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकानं वाचावे असे पुस्तक…मला शिवाजी व्हायचंय!”                                                                                                  –  श्री. विक्रम रा. मोरे, उद्योजक

“नुकतंच तुम्ही लिहिलेलं “मला शिवाजी व्हायचय ” हे पुस्तक मी वाचलं. एक अप्रतिम पुस्तक . अंगावर काटे येत होते पुस्तक वाचताना. यशस्वी होण्यासाठी माणसाच्या अंगी कोणते गुण असायला हवेत त्यांची मुद्देसूद पणे मांडणी या पुस्तकातुन तुम्ही केली आहे . तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले “छत्रपती शिवाजी महाराज” या अतिशय शक्तिशाली व्यक्तिमत्त्वावर सखोल अभ्यास करून त्यांची ध्येय , तत्त्व , विचार तुम्ही या पुस्तकामार्फत वाचकांपर्यंत पोहचविल्या बद्दल मनःपूर्वक आभार.”                                                                                                                                                                                         – श्री. मयूर जाधव, विद्यार्थी

———————————————————————————————————————————

मिडिया