पाठ स्नेहसंबंधचा

पाठ स्नेहसंबंधचा

(मानवी स्नेहसंबंध आणि संघभावना)

माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या समाजाचाच हिस्सा असतो. आपल्याला जर प्रगती साधायची असेल, या जिवनात अद्वितीय असे काही घडवायचे असेल तर आपल्याला लोकांची मदत ही लागतेच. आपण लोकांशी स्नेहसंबंध जपू शकलो तरच, लोक आपल्याला मदत करायला तयार होतील. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती ही आपल्या जिवनात असलेली माणसेच असतात आणि जीवनाचा सम्पूर्ण दर्जा हा आपल्या जीवनातील या लोकांवरच अवलंबून असतो.
आपण कोणत्याही क्षेत्रात असा,  आपले संबंध आपले सहकारी, आपले वरिष्ठ आणि कनिष्ठ, सामान्य जनता यांच्याशी येत असतो. जर या सगळ्यांशी आपण चांगले संबंध ठेवू शकलो तर कामातील सकारात्मकता टिकून राहू शकते.
एक ‘टीम’ म्हणून आपल्याला काम करायचं असतं आणि ते शक्य होऊ शकतं जर टीम मधील सर्वांचा एकमेकांवर विश्वास असेल, एकमेकांशी त्यांचे स्नेहसंबंध चांगले असतील.
आपल्या कामात तसेच आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये आपण हे स्नेहसंबंध कसे जोडू आणि टिकवू शकतो आणि एक संघ म्हणून काम कसे करू शकतो यावरील उत्कृष्ट सेमीनार म्हणजे ‘पाठ स्नेहसंबंधचा’

ठळक मुद्दे

 1. चार प्रकारच्या वागणूकी आणि त्यातील प्रभावी वागणूक कोणती?
 2. इतरांचा विश्वास कसा जिंकावा?
 3. प्रतिक्तिया-प्रतिसाद (लोक जिंकण्याचं स्वतःचा मूड राखण्याचं प्रभावी तंत्र)
 4. शब्दांचा वापर कसा असावा?
 5. कौतुक कसं करावं?
 6. चूक कशी दाखवावी?
 7. माणसे जोडण्याची आणखी पाच तंत्र

अपेक्षित बदल

 1. आपण सगळे वेगळे आहोत याची सगळ्यांना खात्री पटवून देणं त्यामुळे इतरांविषयी अपेक्षा कमी होतील आणि नात्यात वितुष्ट येणार नाही.
 2. आपल्या बाबतीत अचानक काही घडलं तर त्याला नकारात्मक प्रतिक्रिया न देता त्याला प्रतिसाद दिला जाईल आणि त्या प्रसंगाला आपल्या बाजूने वळवता येईल.
 3. वैयक्तिक अहंकारात न अडकता, लोकांशी जोडले जाऊ.
 4. स्नेहसंबंध चांगले रहिल्यामुळे कामातला तसेच जगण्याचा आनंद टिकवता येईल.