तंत्रज्ञान मित्र

तंत्रज्ञान आणि त्याचा पोलीस दलामध्ये वापर

जग सतत बदलत आहे आणि त्याबरोबरच तंत्रज्ञान बदलण्याचा वेग वाढला आहे. नवनवीन गोष्टी रोज मार्केट मध्ये येतायत आणि काही वर्षांपूर्वी खूप जबरदस्त चालणाऱ्या गोष्टी कालबाह्य व्हायला लागल्या आहेत.अगदीच जवळचं उदाहरण म्हणजे ऑनलाइन शॉपिंग मुळे माँल्स बंद व्हायला लागले आहेत.तंत्रज्ञानामुळे जग जवळ यायला लागलं आहे आणि सोशल नेट्वर्किंग वर संवाद वाढायला लागला आहे.पूर्वी एखादी गोष्ट 5 करोड लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वर्षानुवर्ष लागायची आणि आता तीच गोष्ट काही सेकंदातच जगापर्यंत पोहचणे सोपं झालं आहे.जितका फायदा तंत्रज्ञानाचा आपल्याला होतोय तितकाच धोकाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढायला लागले आहे.चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत लगेच पोहचवणं आता व्हाट्सअप आणि फेसबुकमुळे सहज शक्य झाल आहे त्यासाठी सतत बदलणारं तंत्रज्ञान आत्मसात करणं का गरजेचं आहे आणि नियमित वापरले जाणारे मोबाईल अँप्स, सोशलमिडिया साईट्स, व्हाट्सअप यांचा आपण अजून उत्कृष्टरित्या वापर कसा करू शकतो याचा घेतलेला आढावा म्हणजेच हा सेमिनार.

ठळक मुद्दे:

  1. टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
  2. डिजिटल इंडिया काय आहे व त्याचे परिणाम?
  3. VUCA टाईम (Volatility, Uncertainty, Complexity, Ambiguity)
  4. भविष्यात येणारे तंत्रज्ञान
  5. मोबाईल अँप्स सोशलमिडिया साईट्स, व्हाट्सअप चे पोलीस दलासाठी उपयोग

अपेक्षित बदल:

  1. जगाबरोबर बदलणं गरजेचं आहे याची जाणीव व्हावी.
  2. तंत्रज्ञान वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची जाणीव व्हावी.
  3. तंत्रज्ञान वापरताना काय टाळावे हे समजावं.
  4. तंत्रज्ञानाचा वापर पोलिस खात्यात उत्कृष्टरित्या करता यावा.