समजुतींच्या अंतरंगातून सकारात्मक बदलांकडे

समजुतींच्या अंतरंगातून सकारात्मक बदलांकडे

माणूस जसा विचार करतो तसा तो असतो. माणसाचे विचार, भावना, त्याची वागणूक या सर्वांवर त्याच्या समजुतींचं नियंत्रण असतं. या समजुती सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात.
नकारात्मक समजुती नेहमी आपल्या यशाआड़ येत असतात. त्या जर बदलल्या नाहीत तर आपण ठरवून सुद्धा आपल्याला हवं तसं यश गाठू शकत नाही.
या समजुती नकळतपणे आपल्या ड्यूटी, स्नेहसंबंध, मानसिकता, आरोग्य आणि एकंदरित जीवनावर परिणाम करत असतात.
आपल्या सुप्त मनात दडलेल्या या समजुतींचा शोध घेवून, त्यांच्यात हवे ते बदल घडवून आयुष्य कसे बदलावे याचं उत्कृष्ट मार्गदर्शन म्हणजे हा सेमीनार.

ठळक मुद्दे

 1. सुप्त मनाची अद्भुद शक्ति
 2. सुप्त मन आणि जागृत मन यामधील फरक
 3. सुप्त मानाचा योग्य वापर
 4. समजुती म्हणजे काय?
 5. समजुती आपल्या जीवनावर कसा परिणाम करत असतात?
 6. नकारात्मक समजुती
 7. समजुतींचा शोध कसा घ्यावा?
 8. नकारात्मक समजुतींना कसे बदलावे?
 9. असामान्य यशप्राप्तिच्या ८ समजुती

अपेक्षित बदल

 1. आपल्यातील सुप्त मनाच्या शक्तिचा अंदाज यावा आणि त्यांचा योग्य वापर कसा करता येईल हे समजावे.
 2. आपल्यावर परिणाम करणाऱ्या समजुतींचा शोध घेता यावा.
 3. आपल्यातील नकारात्मक समजुती बदलता याव्यात.
 4. यश गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक समजुती निर्माण करता याव्यात.