मराठा 300 – उच्च कार्यक्षमता

मराठा 300 – उच्च कार्यक्षमता

आपल्या प्रत्येकाच्या आत प्रचंड क्षमता दडलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना या क्षमतांची जाणीव मरेपर्यंत होतंच नाही त्यामुळे त्यांचा वापर करणं दुरच राहिलं.
“आपण काय करू शकतो याला मर्यादा नाही. बस! आपण काय करू शकतो हे माहित असायला हवं. आपण ते करू शकतो यावर आपला विश्वास असायला हवा आणि ते करण्यासाठी जीवाचं रान करण्याची आपण तयारी दाखवयला हवी.”

आपल्यात ‘उच्च कार्यक्षमता’ काय असू शकते याचं ज्वलंत उदहारण म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास. घोडखिंडी तली लढाई ज्यात ३०० मावळे तब्बल ८ ते १० तास ५००० आदिलशाही सैन्याशी लढले, अफजलखानाचा वध, महाराजांची आग्रा भेट अशी अनेक उदाहरणे देवून उच्च कार्यक्षमता काय असते हे या सेशनमध्ये उत्कृष्टरित्या मांडले जाते.
शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या मनाला सहज भिड़तो. आणि हीच उच्चकार्यक्षमता आपण आपले कर्तव्य निभावताना कशी वापरु शकतो याचं अपसुकच मार्गदर्शन मिळतं.

ठळक मुद्दे:

  1. उच्च कार्यक्षमता म्हणजे काय?
  2. धेय-कामगिरी समीकरण
  3. लढाऊ वृत्ती काय असते आणि तिचा वापर कसा करावा.
  4. कमीत कमी साधनांचा वापर करुन, जास्तीत जास्त मोठा परिणाम कसा घडवून आणावा.

अपेक्षित बदल:

  1. आपल्या प्रत्येकात उत्कृष्ट असं काही घडवून आणण्याची क्षमता आहे याची जाणीव व्हावी.
  2. आपल्याकडे काय नाही याची तक्रार न करता काय आहे यावर भर दिला जावा.
  3. आपलं कर्त्तव्य निभावताना, आपल्यातलं उत्कृष्ट देता यावं.
  4. उच्च कार्यक्षमतेचा वापर करून आपल्याला हवे तसे परिणाम घडवून आणता यावेत.