भावनिक बुद्धिमत्ता

भावनिक बुद्धिमत्ता

भावना आपल्या जीवनात महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. त्या नकळतपणे तुमची प्रत्येक कृती आणि तुमच्या आयुष्यावर नियंत्रण आणत असतात. या भावना सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या असतात. सकारात्मक भावना तुम्हाला प्रगती साधण्यासाठी सदैव प्रवृत्त करतात तर नकारात्मक भावना तुमच्या प्रगतीच्या आड येत असतात. या भावनांचं योग्य नोयोजन करून आपण मानसिक आणि भौतिक यश कसं गाठू शकतो. त्याच बरोबर लोकांच्या प्रेम परिभाषावेगवेगळ्या असतात, त्या ओळखून जर त्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला तर आपण परस्पर संबंध योग्य पद्धतीने जगू शकतो. याचं मार्गदर्शन म्हणजे हा सेमिनार.

ठळक मुद्दे

  1. भावना म्हणजे काय ?
  2. आपण भावनांना कसे सामोरे जातो?
  3. सकारात्मक भावना आणि त्यांच्या उत्कृष्ट वापर
  4. नकारात्मक भावना आणि त्यांचा सकारात्मक वापर

अपेक्षित बदल

  1. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे
  2. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये आपलं मानसिक संतुलन अबाधित ठेवणे
  3. येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सकारात्मक रित्या सामोरे जाणे
  4. भावनांचा योग्य वापर करून येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळवणे