आर्थिक स्वातंत्र्य

आर्थिक स्वातंत्र्य

पैसा आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ‘पैसा सर्वकाही नसतो’ असं आपण जरी सहज म्हणून गेलो तरी ‘पैसा बरंच काही असतो’ हे सत्य आपण नाकारू शकत नाही. नुसती मेहनत करून, नोकरी –धंदा करून आपण आपल्याला हवा तसा पैसा योग्य मार्गाने कमवू शकत नाही. आलेल्या पैशाला योग्य ठिकाणी गुंतवणं हे आर्थिक यशाचं रहस्य आहे\. जर नियमित आणि योग्य गुंतवणूक आपण केली तर खूप कमी वयात आपण आर्थिक स्वातंत्र्य अनुभवू शकतो. ‘आपण पैशासाठी काम करण्यापेक्षा, पैसा आपल्यासाठी कसा काम करू शकतो.’ याचं मार्गदर्शन म्हणजे हा सेमिनार.

ठळक मुद्दे

 1. पारंपारिक बचतीचे मार्ग?
 2. बचत आणि गुंतवणूक यातील फरक?
 3. बचत आणि महागाई, एक बिघडलेले समीकरण ?
 4. जीवन विमा, आरोग्य विमा यांचे हेतू आणि फायदे ?
 5. शेअर मार्केटची ओळख
 6. मुच्युअल फंड ओळख आणि मार्गदर्शन
 7. फसव्या गुंतवणुकींपासून बचाव

अपेक्षित बदल

 1. बचत आणि गुंतवणूक यातील फरक लक्षात येवून कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे याची माहिती होणे
 2. भ्रष्टाचारासारख्या चुकीच्या गोष्टीच्या आहारी न जाता, योग्य मार्गाने पैसा कसा कमवला जावू शकतो हे कळणे.
 3. जीवन विमा, आरोग्य विमा , म्युच्युअल फंड, RD, FD यांचा योग्य वापर आणि गुणधर्म समजून घेवून कशात किती गुंतवायचे याचे ज्ञान प्राप्त होणे.
 4. योग्य गुंतवणुकीच्या आधारे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या समस्यांना आळा घालणे.