अनियमित दिनचर्या आणि आरोग्य

अनियमित दिनचर्या आणि आरोग्य

जन्माला आलेल्या प्रत्येकाला अमूल्य असे शरीर मिळाले. याच शरीराच्या व बुद्धीच्या मदतीने इतर प्राण्यांपेक्षा मानवाने प्रचंड प्रगती केली. आता २१व्या शतकात तर आम्ही भारतीय प्रगतीच्या EXPRESS WAY वर आहोत. अहोरात्र मेहनत करून आपण आपले राष्ट्र शिक्षण, संशोधन, आरोग्य, सीमासुरक्षा, मानव संसाधन निर्मिती अशा अनेक क्षेत्रात अग्रेसर बनवत आहोत. पण या रोजच्या जीवनातील धकाधकीला सामोरे जाताना माणूस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजेच चांगले पैसे कमावण्यासाठी आरोग्याची हेळसांड करतो. आणि भविष्यात हेच कमावलेले पैसे बिघडवलेल्या आरोग्याच्या पुनर्बांधणीसाठी वापरावे लागतात.
पोलीसदलात काम करत असताना कामाच्या अनियमित वेळा, बदल्या, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी करावी लागणारी धडपड, बदल्यांमुळे कुटुंबापासून लांब रहावे लागणे, जडलेली व्यसने, विविध ताण इत्यादींमुळे आज पोलिसांचे शारीरिक व मानसिक आरोग्य काहीसे अडचणीत सापडले आहे. असं म्हणतात ‘A HEALTHY MIND LIES IN HEALTHY BODY.’ आज पोलीसदलाला कामाच्या निमित्ताने अनेक आव्हानांना हुशारीने सामोरे जावे लागत आहे. त्यातच असणाऱ्या मर्यादित वेळेत पोलिसांना मर्यादित असलेल्या आयुष्यात आरोग्याचे महत्व समजावून देऊन, आरोग्याची काळजी घ्यायला लावणारी कार्यशाळा म्हणजेच ‘IRREGULAR LIFESTYLE AND HEALTH – अनियमित दिनचर्या आणि आरोग्य ’

ठळक मुद्दे 

 1. राजा असो वा रंक सर्वांनाच आरोग्याचे महत्व.
 2. दिनचर्या म्हणजे काय? व अनियमित दिनचर्या म्हणजे काय?
 3. अनियमित दिनचर्येला जबाबदार घटक.
 4. पोलिसांची जीवनशैली व त्यामुळे जडलेल्या व्याधी.
 5. जैविक घड्याळ व त्याची कार्यशैली
 6. उत्तम शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती.

अपेक्षित बदल 

 1. अनियमित दिनचर्येत न थकता सेरेटोनीन व मेलेटोनीनची जादू समजून उत्साही राहणे.
 2. व्यसनांचे दुष्परिणाम समजून घेऊन त्यापासून दूर राहणे.
 3. शरीराची अंतर्गत रचना (हृदय, मूत्रपिंड, डोळे, मेंदू) समजून घेऊन त्यांची काळजी घेणे.
 4. जैविक घड्याळाची कार्यशैली समजून घेऊन त्याप्रमाणे दिनचर्या करणे.
 5. उत्तम प्रकृतीच्या सहाय्याने पोलीसदलात भरीव कामगिरी करणे.