नेतृत्त्वगुण

नेतृत्त्वगुण

नेता तो असतो ज्याला मार्ग माहित असतो, तो त्या मार्गावरून जातो आणि इतरांना मार्ग दाखवतो.
आपल्या प्रत्येकामध्ये एक नेता दडलेला आहे. एक असा नेता जो इतिहास घडवू शकतो. आपल्या जीवनात काही असामान्य घडवण्याची क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये आहे. त्याला गरज आहे ती उत्कृष्ट नेतृत्त्वगुणांची.
एका चांगल्या नेतृत्त्वासाठी लागणारे १० गुण प्रेरणादायी उदाहरणांसह या सेमीनारमार्फ़त कॅडेट्समध्ये बिंबवले जातात.

ठळक मुद्दे

  1. आपण सगळेच नेते कसे?
  2. नेत्याबद्दलच्या गैरसमजूती
  3. नेतृत्त्व गुणांची गरज का?
  4. १० नेतृत्त्वगुण आणि त्यांचे सकारात्मक परिणाम.

अपेक्षित बदल

  1. नेतृत्त्वगुण हे केवळ उच्च पदांसाठी नसतात, याची जाणीव करून देणे.
  2. आपलं पद छोटं नाही, याची त्यांना जाणीव करून देणे.
  3. उत्कृष्ट नेतृत्त्वगुण त्यांच्यामध्ये विकसीत करणे.