संवाद तुझा-माझा

संवाद तुझा-माझा

पती पत्नी एक सर्वात सुंदर असं नातं जे स्त्री पुरुषालाच नव्हे तर दोन कुटुंबाना एकत्र आणतं. सकारात्मक दृष्ट्या पाहिलं तर जन्मजन्मांतरीची साथ. आयुष्याचा गड यशस्वीरित्या सर करण्यासाठी आपल्या आयुष्याचा जोडीदार खऱ्या अर्थाने महत्वाची भूमिका पार पाडत असतो.
परंतु वैयक्तिक अहंम, वैचारिक मतभेत, गैरसमज, संशयी वृत्ती, वाईट सवयी, संसारात दुसऱ्यांची ढवळाढवळ अशा एक ना अनेक कारणांमुळे या नात्यामध्ये कटुता येऊन फूट पडत असते. या नकारात्मक गोष्टींची कीड संसाराला लागली तर अत्यंत सुंदर वाटत असलेलं आयुष्य अचानक एखाद्या भयंकर रोगासारखं वाटू लागतं. परिणामी घटस्फोटाच्या दिशेने पाऊल उचललं जात.
घटस्फोट हे या कौटूंबिक समस्येक उत्तर नाही, हे अचूकपणे हेरून मुंबई पोलिसांनी असं संसार वाचवण्याची अभिनव मोहीम हाती घेतली आहे. पती-पत्नी मधील विसंवादामुळे निष्पाप मुले वाईट वळणं, गुन्हेगारीकडे वळू लागतात. त्यांच्या पावलांना योग्य दिशा देऊन त्यांचं भवितव्य उज्वल करण्याचा संकल्प करुन कुटुंब व्यवस्था भक्कम करण्याच्या अनुषंगाने ‘संवाद तुझा-माझा’ हा उपक्रम मुंबई पोलिसांनी आणि जीवनरंग या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत आहे.
“एकमेकांसोबत जगण्याची स्वप्न पाहून बांधलेली हि घरटी घटस्फोटाच्या वादळवाऱ्यापासूनवाचवून कुटुंब व्यवस्था मजबूत करुया”