मस्त जगा- शानदार, जबरदस्त, जिंदाबाद

‘मस्त जगा’आपण सगळेच धावपळीचं, दगदगीचं जीवन जगत असतो. आठवडाभर विविध जबाबदाऱ्या पेलावताना नाकी नऊ येण्याची वेळ येते. अचानक उद्भवणारे नकोसे प्रसंग, तोचतोचपणा, कामाचं ओझं, कुटुंबाच्या आणि बॉसच्या अपेक्षा…या सर्व बाजू सांभाळताना येणारं अपयश आणि त्याचा परिणाम म्हणजे, निराशा, चिंता, भीती, अस्वस्थपणा आणि अपराधाची भावना. असं वाटतं जीवनातला ‘आनंद’ हरवला आहे. जीवनात आनंद नसेल तर जगण्याला अर्थ तो काय?
अरे पण आनंद मिळवण्यासारखी लागणारी परिस्थिती, वेळ, पैसा, माणसे, साधनसंपत्ती नाहीयेत हो आमच्याकडे! मग कसा आणणार आनंद?
मित्रांनो, आपण नेहमी आनंद आणि यशाची उलटी व्याख्या करत असतो.
आपली समजूत –
मी मेहनत घेईन – यश मिळेल – मी आनंदी होईन
खरी व्याख्या –
मी आनंदी असेन – खूप मेहनत करेन – यश मिळेल अशी असायला हवी.
तुमच्या यशाची सुरुवात ही तुमच्यातल्या आनंदाने होते. तुम्ही आनंदी नसाल तर इतरांना काय आनंद देणार? आपल्याकडे बघून इतरांना वाटायला हवं, ‘जगावं तर असं!’
तर मित्रांनो घेवून आलोय, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आनंद कसा टिकवून ठेवावा याचे जबरदस्त मार्ग. धावपळ तीच, स्पर्धा तीच, चढाओढ तीच. तरी आनंदी कसं राहता येईल आणि हवं ते यश कसं गाठता येईल, जाणून घ्या या अद्वितीय सेमिनारमध्ये ‘मस्त जगा…शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!’.
अविस्मरणीय अशा चार तासांसाठी तयार व्हा. मनोरंजक पद्धतीने, हसत-खेळत जीवनाचे मौल्यवान धडे… 14067507_1206903516038663_1290666525577277327_n

Project Data
DATE CLIENT FORMAT STATUS
Jun 2013 Company Inc. PDF (1.2Mb) Complete
Share This:

Related ProjectsYou might also be interested in these

मस्त जगा- शानदार, जबरदस्त, जिंदाबाद

‘मस्त जगा’आपण सगळेच धावपळीचं,